Monday, November 8, 2010

जा रे भिका~या

जा रे भिका~या
माझ्या रक्तात विर्लेले एक एक क्षण
उसवत असतो मी
माझ्या तोंडाला सुई दोरा घेवुन
शिवत असतो मी
तूच म्हणाली होतीस ना .
मला तुझे काही एइकायचे नाही
मला तुझ्यात एकंदर
मिसळयाचे नाहीच नाही
अच्छा ......ठीक आहे
बघ आज मी अचट विचट रुपात
फार कुरूप दिसत आहे
तुझ्या सावली पासून दूर पण
उन्हात्त उभा आहे
माझ्या अवस्थे कड़े पाहून मला
कोणी भिक ही देत नाही
मला भिकारिही त्यांच्या समूहात
जागा करुण देत नाही
मी असा झालो ते फक्त तुझ्या साठी
तुझ्या एका शब्दा वर
"जा रे भिका~या "
आज मलाच माझा हेवा वाटतो
हेच तुला मी कळवतो ..
आणि जगाचा निरोप घेतो

Subscribe to my Kavita by Email
This Kavita provided by
marathi--world

No comments:

Post a Comment